मुंबई -मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख ( Minister Aslam Shaikh ) व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांच्यावर मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) सार्वजनिक ठिकाणी तलवार ( Sward ) दाखवल्या कारणावरून तक्रार दाखल करून घेतली. या कार्यक्रमात प्रतीकात्मक पद्धतीने काँग्रेस मंत्र्यांकडून ही तलवार दाखवण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांची भूमिका अयोग्य असून या प्रकरणावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांच्यावर नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये गृहखात्या बाबत चर्चा नक्की होईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) कडून देण्यात आला आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली ( Congress Upset on Home Ministry ) आहे. यापूर्वी शिवसेनेचे नेतेमंडळीही गृहमंत्र्यांनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर आता काँग्रेसने थेट गृहमंत्र्यांवर आपली नाराजी व्यक्त केल्याने महा विकास आघाडीत सर्व आलबेल आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्राच्या जनतेचा राज्यपालांनी विरोधात उद्रेक होईल -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. लोकहिताचे कायदेही राज्यपालांकडे थांबवली जातात. विद्यापीठाच्या कायद्यात बदल करण्यात आला असून बाबतच्या विधेयकावर राज्यपाल सही करण्यास विलंब करत आहेत. राज्य सरकारची अशाप्रकारे अडवणूक राज्यपालांकडून सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांच्या कडून करण्यात आला आहे.