मुंबई - काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एक धक्का मानला जात आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्या आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींचा पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा, शिवसेनेत करणार प्रवेश - sanjau raut
काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एक धक्का मानला जात आहे. त्या आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी करणार शिवसेनेत प्रवेश
कोण आहेत प्रियांका चतुर्वेदी
प्रियांका चतुर्वेदी यांनी डीएनए, तेहलका, फर्स्टपोस्ट यासारख्या वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. बाल, शिक्षण, महिला सबलीकरण आणि आरोग्य यासारख्या विषयावर त्या कार्यरत आहेत.
२०१३ साली प्रियांका चतुर्वेदी यांची काँग्रेसच्या प्रवक्त्या म्हणून निवड झाली होती. वृत्तवाहीन्यांवर, सोशल मिडीयावर पक्षाची बाजू हिरीरीने मांडण्यात त्या अग्रेसर होत्या.