महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशातील बँका डुबवण्यात भाजपचे नेते आघाडीवर - सचिन सावंत - काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत

भाजप सरकारकडे लोकांना तोंड दाखवायला जागा नाही. त्यामुळे निवडक कार्ट्यांवर कारवाई करत असल्याचा देखावा केला जात आहे. तसेच आपल्या जवळच्या लोकांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी यावेळी केला

भाजपविरोधात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत

By

Published : Jun 6, 2019, 7:51 AM IST

मुंबई- सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना डुबवण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आले आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बँक लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

भाजपविरोधात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत

बँकांचा म्हणजेच जनतेचा पैसा लुबाडण्याचे प्रकार भाजप सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. याबद्दल रिझर्व्ह बँकेनेही स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये भाजप नेत्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी भाजपच्या खासदार पूनम महाजन या 'विलफुल डिफॉल्टर' असल्याचे उघड झाले होते. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही 'वन टाईम सेटलमेंट'चा फायदा घेऊन बँकांना चुना लावला. यामध्येही भाजप सरकारची छत्रछाया त्यांच्या कामी आली. आता कंबोज यांनीही बँक ऑफ बडोदाला डुबवले आहे. बँकांना डुबवून उजळ माथ्याने फिरणे हे सरकारच्या छत्रछायेशिवाय शक्य नाही, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

मोहित भारतीय (कंबोज) हे हेतूपुरस्सर विलफुल डिफॉल्टर असल्याची जाहीरात बँक ऑफ बडोदाने वर्तमानपत्रात दिली आहे. अशा सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई करून जनतेचा पैसा पुन्हा बँकेत परत आला पाहिजे. त्यासाठी सरकारने पावले उचलण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. भाजप सरकारकडे लोकांना तोंड दाखवायला जागा नाही. त्यामुळे निवडक कार्ट्यांवर कारवाई करत असल्याचा देखावा केला जात आहे. तसेच आपल्या जवळच्या लोकांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details