महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्तेसाठीचा घोडेबाजार बंद करा - युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन - भाजप

कर्नाटक काँग्रेसच्या ११ आमदारांना जबरदस्ती हॉटेलमधे डांबले असून त्यांचा राजीनामा परत घ्यावा, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन केले.

आंदोलन करताना काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते

By

Published : Jul 8, 2019, 11:26 PM IST

Updated : Jul 8, 2019, 11:31 PM IST

मुंबई- कर्नाटक काँग्रेसच्या ११ आमदारांना जबरदस्ती हॉटेलमधे डांबले असून त्यांचा राजीनामा परत घ्यावा, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी धरपकड करुन या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलन करताना युवक काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते


कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामा दिला. त्यानंतर हे सर्व आमदार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधरणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहचले.


आज मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांनीही सोफिटेल हॉटेलच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. युथ काँग्रेसचे सॉफीटेल हॉटेलबाहेर घोडागाडी घेऊन आंदोलन केले. भाजप विरोधी घोषणाबाजी करताना पोलिसांसोबत हमरातुमरी झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांचे अटक सत्र सुरु झाले.

११ आमदारांनी सुटका करा, अशी मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते घोषणाबाजी करु लागले. यावेळी त्यांनी भाजपविरोधात घोषणाही दिल्या. तसेच, भाजप सत्तेसाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावला. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी गणेश यादव यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


भाजप लोकशाहीची गळचेपी करत आहे. काँग्रेसच्या आमदारांना बळजबरीने मुंबईत आणले आहे. भाजप नेते खुलेआम आमदारांना येऊन भेटत आहेत. मात्र, काँग्रेस नेत्यांना हॉटेलमध्ये प्रवेशही दिला जात नाही. भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जात असून आम्ही भाजपचा निषेध करत आहोत, असे युथ काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव म्हणाले.

Last Updated : Jul 8, 2019, 11:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details