मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करणार आहे. त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी 125 जागा काँग्रेस तर 125 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उर्वरीत 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा झाडे तोडायला विरोध, तर उद्धव ठाकरे मेट्रो भवनच्या भूमीपूजनात व्यस्त
यावेळी बोलताना पवार म्हणाले, काँग्रेस, एनसीपी, शेकाप, जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर डावे पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील. विरोधी पक्षात राहण्यात अनेकांची मानसिकता दिसत नाही. मात्र, आपल्याला विरोधी पक्षात राहण्यात अधिक समाधान मिळते, असेही पवारांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
- दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुका