मुंबई Congress NCP On Lalit Patil Case :माफिया ललित पाटील यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात ड्रग्जचा असलेला मोठा साठा समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये राजकीय वरदहस्त असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. (Rohit Pawar) ड्रग्जच्या काळ्या धंद्यात ललित पाटील हा केवळ एक प्यादा आहे. त्यामुळे या प्रकरणातील मास्टर माईंड कोण आहे, त्याचा शोध लागला पाहिजे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि प्रगत राज्याचा नावलौकिक धुळीला मिळवण्याचे काम भाजपाने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Eknath Khadse)
मुंबई पोलिसांचे अभिनंदन:ललितपाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. तसेच नाशिकमध्ये ड्रगचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर सोलापुरातील एमआयडीसी मध्येही ड्रग्जचा साठा आढळला आहे. तर महाराष्ट्रात अशा प्रकारे ड्रग्जचे साठे कुठे आहेत? आणखी किती आहेत? हे शोधणे गरजेचे आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी घटना असून ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात सर्व सोयींचा उपभोग कसा घेत होता हे आता समोर आले आहे. ड्रग्जच्या या काळ्या धंद्यात कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाच्या वरदस्त आहे हे उघड झाले पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी केली.
अजूनही अनेक ललित मोकाट:ललित पाटीलयासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ललित पाटील याचा आतापर्यंत शोध लागत नव्हता. अखेर 15 दिवसांनी तो सापडला आहे. मात्र, त्याने दिलेली माहिती धक्कादायक असून राज्यात असे आणि किती ललित पाटील मोकाट आहेत हे सरकारने शोधून काढायला हवे. तसेच पुण्याच्या ससून रुग्णालयातील वार्ड क्रमांक 16 चे नेमके रहस्य काय हे राज्यातील जनतेच्या समोर यायला पाहिजे असेही म्हणाले आहेत. ललित पाटील याला तुरुंगात टाकून सर्व प्रकरण मिटले, असा आव सरकारने आणू नये. आरोपीला पळायला कोणी मदत केली होती. महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद या पाटीलला होता. रुग्णालयात सोयी पुरवण्याचे धंदे कसे सुरू होते आणि या ड्रग्जचे सर्व धागेदोरे राज्यात कुठेपर्यंत पोहोचले आहे असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.