महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज करण्याची मुदत ६ जुलैपर्यंत - विधानसभा निवडणूक

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे.

मुंबई

By

Published : Jun 22, 2019, 9:11 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर काँग्रेसकडून राज्यात सावध पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरुवात केली असून विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्वतयारीचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज ६ जुलै २०१९ पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details