मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. त्यानंतर तपासात धक्कादायक खुलासे समोर आले. या सर्व घटनांमुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परबिर सिंह यांची उचलबांगडी केली. यावरून आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
सरकारची प्रतिमा डागाळू शकते-
वाझे प्रकरणात पोलीस दलात झालेल्या बदल्यांवरून निशाणा साधताना संजय निरुपम यांनी म्हटले आहे, की 'शिवसेना माजी आयुक्त परमबिर सिंह यांचा जयजयकार करत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परबिरसिंह यांनी चूक केली होती, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या दोन्ही भूमिका विरोधाभासी आहेत आणि या भूमिकांमुळे सरकारची प्रतिमा डागाळू शकते.'