मुंबई - केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपा सरकारकडून ईडीचा गैरवापर केला जात असल्याची टीका नेहमीच केली जाते. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटू लागले आहे. या प्रकरणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी "माझा अंदाज खरा ठरत आहे" असे ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस : माझा अंदाज खरा ठरला - सचिन सावंत - देवेंद्र फडणवीस न्यूज
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. या नोटिसीचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे. या प्रकरणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी "माझा अंदाज खरा ठरत आहे" असे ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीची नोटीस -
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. 29 तारखेला त्यांना चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. संजय राऊत हे नेहमीच भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच सामनामधून वेळोवेळी भाजपावर टीका करत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटिसीचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे.
अंदाज खरा ठरला -
तर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी 4 डिसेंबर रोजी " यथा मोदी तथा फडणवीस दोघांनाही पराभव स्विकारण्याची खिलाडूवृत्ती नाही. गिरे तो भी टांग उपर - अशीच त्यांची भूमिका असते! आता ईडी सारख्या यंत्रणेला चवताळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सोडले जाईल. इन्कमटॅक्सच्या नोटिसांचे प्रिंटींग जोरात सुरू होईल." असे ट्विट केले होते. या ट्विटवर ट्विट करत "हा अंदाज खरा ठरत आहे" असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे. आपण 4 डिसेंबर रोजी वर्तवलेला अंदाज आज खरा ठरत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
4 डिसेंबरला केलेले ट्विट -
यथा मोदी तथा फडणवीस दोघांनाही पराभव स्विकारण्याची खिलाडूवृत्ती नाही. गिरे तो भी टांग उपर - अशीच त्यांची भूमिका असते! आता ईडी सारख्या यंत्रणेला चवताळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सोडले जाईल. इन्कमटॅक्स च्या नोटिसांचे प्रिंटींग जोरात सुरू होईल.
आज केलेले ट्विट -
हा अंदाज खरा ठरत आहे
हेही वाचा -मिलिंद नार्वेकर यांची एमपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमनपदी निवड
हेही वाचा -..तर मी न्यायालयात जाईन, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा