मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. देशातील कोरोना परिस्थिती पंतप्रधानांना आटोक्यात आणता आलेली नाही. मात्र, त्याच जागी जर नितीन गडकरी हे असते तर त्यांनी ही परिस्थिती योग्यरीत्या हाताळली असती, अशी स्तुतिसुमने नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर उधळली आहेत. तसेच अशी चर्चा भाजपच्या एक गोटातही केली जात असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. तसेच नागपूरकरांनी नितीन गडकरी यांना भावी पंतप्रधान म्हणूनच मते दिली होती. त्यामुळे नितीन गडकरी जर पंतप्रधान झाले तर नागपूरकर त्यांचे स्वागत करतील, अशी भावनाही नाना पटोले यांनी व्यक्त केली.
खतांच्या वाढलेल्या किंमती विरोधात काँग्रेस राज्यभरात घंटानाद आंदोलन करणार आहे. तर तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आज (दि. 19 मे) केली जाणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नुकसानाची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये येत आहेत. मात्र, त्यांनी थोडा वेळ काढून महाराष्ट्राचीही पाहणी करावी, असा चिमटा नाना पटोले यांनी काढला.
केंद्र सरकारकडून खतांच्या किमती वाढवण्यात आलेले आहेत. खताच्या प्रत्येक पोत्यामागे जवळपास सातशे रुपयांची दरवाढ केंद्र सरकारने केली आहे. या दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यभरात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करून खतांच्या वाढलेल्या किंमतीच्या विरोध काँग्रेसकडून केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून देण्यात आली. सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याचा काम केले आहे. शेतकऱ्यालाही आता कळून चुकले की, मोदी सरकार हे शेतकऱ्यांचा सरकार नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केंद्र सरकारला लगावला आहे.
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी