मुंबई- टीआरपी घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थो दासगुप्तासह एका वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या दरम्यान घडलेल्या व्हाट्सअॅप चॅटच्या मुद्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आलेली आहे.
...म्हणून गोस्वामी विरोधात तक्रार
अर्णब गोस्वामी ही व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे भाई जगताप यांनी म्हणाले. अर्णब गोस्वामीच्या चॅटमध्ये देशाच्या संरक्षणाविषयी बाबी उघड करण्यात आलेल्या आहेत. त्या दिल्लीतील कार्यालयामधून त्यांना मिळाल्या आहेत का? किंवा सुरक्षा विभागांमधून ही माहिती अर्णब गोस्वामीपर्यंत पोहोचली आहे का ? याचा तपास पोलिसांकडून करण्यात यावा म्हणून तक्रार देत असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले आहे.