महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' उमेदवारामुळे भाजपचे काँग्रेसमुक्तीचे स्वप्न भंगले - bjp

लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा दिला होता. मात्र, त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर हे विजयी झाल्याने भाजपचे स्वप्न भंगले आहे.

बाळू धानोरकर

By

Published : May 24, 2019, 10:32 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा दिला होता. मात्र, त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर हे विजयी झाल्याने भाजपचे स्वप्न भंगले आहे. केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत धानोरकर हे जायंट किलर ठरले.

काँग्रेसला राज्यात एकमेव जागा जिंकता आली आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा दिला होता. मात्र, बाळू धानोरकरांनी भाजपचा नारा यशस्वी होऊ दिला नाही. राज्यात युती ४५ जागा जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला होता. मात्र, युतीला यावेळी ४१ जागा जिंकता आल्या. यामध्ये भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या.

निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर वगळता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांपासून ते सुशीलकुमार शिंदेंपर्यंत सगळ्यानांच पराभवाला सामोरे जावे लागले.

ABOUT THE AUTHOR

...view details