मुंबई -काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी ऑगस्ट क्रांती मैदान येथे ध्वजारोहण करुन गिरगाव चौपाटीच्या दिशेने तिरंगा मार्च निघाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला सुरुवात झाली असून यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती.
'संविधान बचाओ भारत बचाओ'; मुंबईत काँग्रेसचा तिरंगा मार्च हेही वाचा - सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल
काँग्रेस पक्षाचा आज (शनिवार) १३५ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल हॉल ऑगस्ट क्रांती मैदान येथे काँग्रेसच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या सेवा दलाने झेंड्याला सलामी दिली. यावेळी काँग्रेस आमदार उपस्थित होते.
'संविधान बचाओ भारत बचाओ' मुंबईत काँग्रेसचा तिरंगा मार्च थोरात म्हणाले, "आजचा मोर्चा हा शांतीचे प्रतिक आहे. काँग्रेसच्या वर्धापनदिनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप या कायद्याला विरोध करण्यासाठी तिरंगा मोर्चा काढला आहे."
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "देशात अशांतता पसरवण्याचे काम केंद्रातील सरकार करत असून आता प्रत्येक राज्यात ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळेच आज एनआरसी आणि सीएए या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस शांती मार्च काढत आहोत."
काँग्रेसचा १३५ वा स्थापना दिवस दिल्लीत साजरा -
दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये तिरंगा ध्वज फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोतीलाल व्होरा, ए. के अॅन्टोनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
हेही वाचा..अशी असणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना