मुंबई- लोकसभेच्या निवडणुकीत देशभरात दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने पुढील महिनाभर पक्षाचा कोणताही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील डिबेट शोमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माध्यमांत विशेषतः वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमांत काँग्रेसचा एकही प्रवक्ता सहभागी होणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
काँग्रेसचे फरमान; पुढील एक महिना वृत्तवाहिन्यांवर दिसणार नाहीत काँग्रेस प्रवक्ते - प्रवक्ते
लोकसभेच्या निवडणुकीत देशभरात दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसने पुढील महिनाभर पक्षाचा कोणताही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील डिबेट शोमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचे फरमान; पुढील एक महिना वृत्तवाहिन्यांवर दिसणार नाहीत काँग्रेस प्रवक्ते
पुढील एक महिना वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चेत काँग्रेस पक्षाच्यावतीने कोणताही प्रवक्ता सहभागी होणार नाही, असा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने घेतला आहे. यासंदर्भात सर्व वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना माहिती देऊन, काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता किंवा अन्य नेत्यांना चर्चेसाठी बोलावू नये, अशी विनंती करण्यात आल्याचेही पाटील यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.