महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Congress Criticizes Raj Thackeray : भाजपने मनसेचे इंजिन घेतले ताब्यात, राज ठाकरेंच्या भाषणावर काँग्रेसची टीका - Congress criticizes Raj Thackeray

राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या भाषणावर आता काँग्रेसकडून देखील प्रतिक्रिया आली असून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत ( Congress spokesperson Sachin Sawant ) यांनी राज ठाकरे यांचे मनसेचे इंजिन पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतले असल्याची टीका ( Congress criticizes Raj Thackeray ) राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज ठाकरें
राज ठाकरे

By

Published : Nov 27, 2022, 10:57 PM IST

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Maharashtra Navnirman Sena ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आज मुंबईतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुल येथे पक्षाच्या गटप्रमुखांची सभा घेतली. या सभेत मार्गदर्शन करताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका ( Raj Thackeray criticizes Rahul Gandhi ) केली होती.

राज ठाकरेंच्या भाषणावर काँग्रेसची टीका

मनसेचे इंजिन भाजपच्या ताब्यात - राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांचा मेंदू गुळगुळीत झाला आहे अशी, टीका आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावर आता काँग्रेसकडून देखील प्रतिक्रिया आली असून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज ठाकरे यांचे मनसेचे इंजिन पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतले असल्याची टीका राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज ठाकरेंचा मेंदू गहाण - गेल्या सोळा वर्षात राज ठाकरे यांनी सातत्याने भूमिका बदलल्या मात्र, त्याचं खापर आता राज ठाकरे जनतेवरच फोडत आहेत. राज ठाकरे यांनीच आपला मेंदू भारतीय जनता पक्षाकडे गहाण ठेवला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या बुद्धिमत्तेवर बोलू नये असा, जोरदार हल्ला सचिन सावंत ( Congress spokesperson Sachin Sawant ) यांनी राज ठाकरे यांच्यावर चढवला . आज राज ठाकरे इतर पक्षाच्या प्रवक्ते वापरलेल्या भाषेवर टीका करत आहेत. मात्र, या प्रवक्त्यांचे शिरोमणी स्वतः राज ठाकरे आहेत असा, चिमटा सचिन सावंत यांनी काढला आहे.


थोर महापुरुषावर चिखल फेक नको हे मान्य - मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून देशातील थोर महापुरुषांवर चिखल फेक करणे बंद केले पाहिजे असा आवाहन केलं. काँग्रेसने देखील महापुरुषांवर चिखल फेक व्हायला नको असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले आहेत. मात्र सध्या महापुरुषाच्या नावाखाली देश वाचला जातो. तसेच वीर सावरकर यांनी ब्रिटिशांशी माफी मागितली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर स्वातंत्र्यलढाणा चालवला नाही असं अतुल लोंढे म्हणाले आहेत. राहुल गांधी हे त्या घरातले आहेत ज्यांनी कधीही माफी मागितली नाही. राज ठाकरे आता त्याच राहुल गांधीचा मेंदू काढत आहेत असा, टोला अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details