मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती देशभर साजरी करण्यात येत आहे. जयंतीदिनी रात्री १२ वाजता काँग्रेसकडून आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. दक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
काँग्रेसने रात्री १२ वाजता साजरी केली भीमजयंती, एकनाथ गायकवाड यांनी अर्पण केला पुष्पहार - आंबेडकर
चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पुतळ्यास एकनाथ गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुष्पहार अर्पण केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा
चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथील पुतळ्यास एकनाथ गायकवाड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी गार्डन आणि परिसरात जयंती उत्सव समितीतर्फे विविध रंगाच्या लायटिंग पताका, लेसर लाईट तसेच देखावे करण्यात आले होते. नागरिक आणि रहिवाशी यांनी १२ वाजता फटाके फोडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.