महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या पहिल्या यादीचा कार्यक्रम पुढे ढकलला; त्यानंतरच होणार नावे जाहीर - काँग्रेसची विधानसभेसाठी पहिली यादी

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी १२५ जागा वाटपाचा विषय मार्गी लागला असल्याने काँग्रेसकडून शुक्रवारी पहिली उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने आतापर्यंत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसल्याने काँग्रेसने त्यासाठी सावध भूमिका घेतली आहे.

फाईल फोटो

By

Published : Sep 20, 2019, 11:41 PM IST

मुंबई -केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केला नाही. त्यातच शुक्रवारी दिल्लीमध्ये यासंदर्भात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसकडून शुक्रवारी राज्यात जाहीर करण्यात येणाऱ्या पहिल्या उमेदवारी यादीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार नाही तोपर्यंत काँग्रेसकडून यादी जाहीर केली जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी १२५ जागा वाटपाचा विषय मार्गी लागला असल्याने काँग्रेसकडून शुक्रवारी पहिली उमेदवाराची यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने आतापर्यंत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नसल्याने काँग्रेसने त्यासाठी सावध भूमिका घेतली आहे. त्यातच निवडणूक आयोगाची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. यामध्ये झारखंड येथील विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याविषयी चर्चा झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेसने राज्यात आज जाहीर करण्यात येणारी पहिली उमेदवाराची यादी तयार असतानाही थांबवल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिवसेनेची यादी आपणच तयार करा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

काँग्रेसची पहिली यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान काँग्रेसकडून जाहीर करण्यात येणाऱ्या पहिला यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांसोबतच काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांची नावे होती, असेही सांगितले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details