मुंबई - लोकसभा निवडणुकीत मला मतदान करा, असे आवाहन करत मॉर्निंग वॉक् विथ प्रचार असा नवा फंडा काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आज केला. मुंबई दक्षिण-मध्य मधून लोकसभेची निवडणूक एकनाथ गायकवाड लढवत आहेत.
काँग्रेसचा मॉर्निंग वॉक विथ प्रचार! प्रचारात मनसेही सहभागी - loksabha
लोकसभा निवडणुकीत मला मतदान करा, असे आवाहन करत मॉर्निंग वॉक् विथ प्रचार असा नवा फंडा काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी आज केला.
शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉक करत एकनाथ गायकवाड यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यासोबत मॉर्निंग वॉक केला. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मतदारांना केवळ स्वप्न दाखवली. ती कधीच पूर्ण केली नाहीत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाऊ, असे एकनाथ गायकवाड यावेळी म्हणाले. तर आम्ही महाआघाडीत नसलो तरीही मोदीं विरोधात आमची लढाई आहे. या लढाईत आम्ही सगळ्यांसोबत आहोत असे स्पष्ट त्यांनी स्पष्ट केले.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मोदी-शहाला विरोधाचा भाग म्हणुनच मॉर्निंग वॉक मधे सहभागी झालो असल्याचे ईटिव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले.