नवी मुंबई -पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून काही शहरांत हे दर प्रति लिटर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या विरोधात नवी मुंबई शहर काँग्रेसच्या वतीने केक कापून आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.
नवी मुंबईत पेट्रोलने गाठली शंभरी -
पेट्रोलचे दर आता १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आता वाहन चालवणे कठीण झाल्याचा आरोप करत नवी मुंबई शहर कॉंग्रेसच्या वतीने नेरुळ पामबीच रोड येथील पेट्रोल पंपाजवळ केक कापून आंदोलन करण्यात आले. या केकवर 'पेट्रोल के अच्छे दिन आ गये' अशा प्रकारचे घोषवाक्य लिहिण्यात आले होते. तसेच यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरीकांना पेट्रोलच्या चढत्या दरांमुळे महागाई कशी वाढत आहे, याविषयी माहिती देण्यात आली.
हेही वाचा - भयान दुष्काळ भोगणारे जसकांडी गाव, आता इतर गावांना करते पाण्याचे वाटप