मुंबई - निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सामान्य जनतेला आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात अभिंनदन केले आहे. 'डोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत अर्थसंकल्पाचे स्वागत केले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे विधी मंडळातील मुख्य प्रवक्ते आमदार राज पुरोहित उपस्तिथ होते.
अर्थसंकल्पात सामान्य, मध्यमवर्गीयांना दिलासा; पंतप्रधानांचे अभिनंदन - tax
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प सामान्य जनतेला आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात अभिंनदन केले आहे. 'डोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
देशातल्या सामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेला अर्थसंकल्पाने दिलासा दिला आहे. आयकर मर्यादा अडीच लाखाहून थेट ५ लाख करण्यात आली आहे. यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे, शेलार यांनी यावेळी सांगितले. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात जीएसटीत आणखी बदल करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे. आणखी ८ कोटी महिलांना स्वयंपाकाचा गॅस विनामूल्य देण्यात येणार आहे. अशा योजना सामान्य जनतेला लाभदायक असल्याने पंतप्रधान मोदी यांचे आम्ही अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांच्या टीकेबाबत बोलताना शेलार म्हणाले, की मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला. म्हणून विरोधकांच्या पोटात दुखत आहेत. या बजेटमधून सर्वसामान्यांना जे हवे होते ते मोदी सरकारने दिले. जेव्हा जनता खुश असते तेव्हा काँग्रेस नाराज असते, हे आम्ही गेली अनेक वर्षे पाहिले आहे, असा टोला ही त्यांनी विरोधकांना लगावला.