महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Conflict in NCP : राष्ट्रवादीतील दोन्ही गटात संघर्ष वाढला, तर विरोधी पक्षनेत्यांची विधानसभा अध्यक्षांकडं 'ही' मागणी - maharashtra political crisis

Conflict Increased In NCP: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या दालनात लवकरच होणार आहे. (Power Struggle in Maharashtra) आमदार अपात्रतेच्या सुनावणीला (Assembly Speaker) सुरुवात होणार आहे. (Conflict in NCP) त्यामुळं राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. (Vijay Wadettiwar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील संघर्ष वाढत चालला आहे, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून मागणी केली आहे. अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाइन लाईव्ह दाखवा, अशी ही मागणी आहे. (Disqualified MLA Case)

Conflict Increased In NCP
अजित पवार, शरद पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 6:56 AM IST

Updated : Sep 24, 2023, 7:57 AM IST

आमदार अपात्रतेच्या निर्णयावर मत मांडताना काकासाहेब कुलकर्णी

मुंबई : Conflict Increased In NCP : आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. (Power Struggle in Maharashtra) महाराष्ट्राच्या सर्वांत मोठ्या बंडखोरी प्रकरणी आमदारांच्या अपात्रतेबाबत आपल्याकडं (विधानसभा अध्यक्ष) सुनावणी होणार आहे. याकडं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही न्यायप्रेमी जनतेचं लक्ष लागून आहे. (Conflict in NCP) सर्वोच्च न्यायालयानं देखील आपणास योग्य निवाडा करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यामुळं या प्रकरणात नेमकं काय घडणार आहे याची उत्सुकता जनतेला आहे. त्यामुळं शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाइन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्रातील जनतेपुढं करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते यांनी विधानसभा अध्यक्षांकडं पत्राद्वारे केलीये.

सुनावणीचं थेट प्रक्षेपण करावं : संविधानिक संस्था, संविधानिक पदं आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचं थेट प्रक्षेपण करावं, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे केलीये.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दोन्ही गट आक्रमक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आक्रमक होत शरद पवार गटानं अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र करण्यासाठीचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं. त्यानंतर अजित पवार गट देखील आक्रमक झाला असून, शरद पवार यांना समर्थन देणाऱ्या दहा आमदारांची आमदारकी तत्काळ रद्द करावी, अशा प्रकारचं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलंय.

आमदार अपात्रतेचा तिढा : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांनी पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवला असल्यानं विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात अजित पवार गटानं लिहिलंय. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, सुनील भुसारा, संदीप क्षीरसागर तर विधान परिषद सदस्यांमध्ये अरुण लाड, एकनाथ खडसे आणि शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटातील सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे आणि अनिकेत तटकरे यांना अपात्र करण्यासाठी शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आलीये. तर विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर यांच्या विरोधातही जितेंद्र आव्हाड यांनी याचिका दाखल केलीये. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट आक्रमक झाल्याचं चित्र आहे. पुढील आठवड्यात विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यासंदर्भात सुनावणी घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपाच्या हिताच्या बाजूनेच निर्णय येईल : विधानसभा अध्यक्षांच्या समोर होणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीये. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या दहा आमदारांना अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना जे पत्र देण्याबाबत राजकारण सुरू आहे, त्यामागं भाजपा असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 'ए' आणि 'बी' म्हणजे विभक्त करण्याचं काम भाजपानं केलंय. येणाऱ्या काळात भाजपा काही करू शकते हे यावरून स्पष्ट होतं. त्यामुळं मुळात नार्वेकर हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यानंतर ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं अगदी शेंबड्या पोराला जरी विचारलं तरी निर्णय कोणाच्या बाजूनं लागेल तर त्याचं उत्तर भाजपाच्या हिताच्या बाजूनेच येईल, एवढंच मला सांगायचं असल्याचं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. Supriya Sule on Ajit Pawar : अजित पवारांच्या विरोधात मी बोलले नाही, बोलणारही नाही, कारण...; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
  2. Nana Patole on Ramesh Bidhuri : रमेश बिधुडी यांना अपात्र करुन खासदारकी रद्द करा; कॉंग्रेसची मागणी
  3. Kirit Somaiya On Oxygen Scam : कोविडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला १०० कोटींचा ऑक्सिजन घोटाळा - किरीट सोमैया
Last Updated : Sep 24, 2023, 7:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details