महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार- कृषिमंत्री - कृषिमंत्री अब्दुल सत्तार

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार
कृषीमंत्री अब्दुल सत्तार

By

Published : Dec 15, 2022, 9:50 PM IST

पत्रकार परिषदेत बोलताना कृषीमंत्री

मुंबई -राज्यात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पाऊस पडतो आहे या पावसामुळे संत्रा पिकाचे तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीकाऱ्यांची भरपाई राज्य सरकारकडून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार -दरम्यान, या संदर्भात राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता पाऊस साधारण किती दिवस पडला आहे कोण कोणत्या भागात पडला आहे याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे या पावसामुळे कोणत्या ठिकाणी किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याचा आढावा घेऊन त्यानुसार पंचनामे केली जातील आणि या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details