मुंबई - आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे.
Market Committee Elections : सर्वसामान्य शेतकरी आता बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील - maharashtra cabinet decision
सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक (Market Committee Elections) लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
काय आहे हा नियम - या अधिनियमाच्या 13 (1)(अ) या कलमामध्ये सुधारणा करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सुधारणेमुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येईल.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य आणि ग्रामपंचायतचे सदस्य यांना मतदान करण्याचा अधिकार होता. मात्र राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना देखील मतदानाचा अधिकार दिला जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाजार समित्यांमध्ये सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.