मुंबई -कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्षला फोर्ट न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भारती आणि हर्ष यांच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. भारती आणि हर्ष यांना मुंबई फोर्ट कोर्टात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे, उद्या त्याच्यावर सुनावणी होणार असल्याची माहिती एनसीबीची वकील सरपांडे यांनी दिली.
भारती सिंह आणि हर्ष यांना ड्रग्सप्रकरणी एनसीबीने अटक केली होती. या दोघांनाही 14 दिवसांची म्हणजेच 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. भारती आणि हर्षवर कलम 20 B आणि कलम 27 लावण्यात आली आहेत. 27A म्हणजेच ड्रग संबंधित आर्थिक व्यवहार किंवा देवाणघेवाण किंवा ड्रग्समधून आर्थिक नफा मिळवणे असे, या आरोपातून त्यांची सुटका झाली आहे. एनसीबीची वकील अतुल सरपांडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला आज रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यांच्याबरोबर इतर दोघांचीही चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीही करावयाची असल्याने एकूणच वैद्यकीय चाचणीला वेळ लागला होता, असे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समिर वानखेडे यांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांना आता पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले . यावेळी न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे भारतीने जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर उद्या सुनावणी होईल. यापूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल, दीपिका पदुकोन, सारा अली खान, फिरोज नाडियाडवाला यांचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे.
शनिवारी एनसीबीने मुंबईत अनेक छापे टाकले होते. तामध्ये एनसीबीने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगच्या घरी चौकशी केली. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांना भारतीसिंह यांच्या फ्लॅटमधून ड्रग मिळाले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर भारती व पती हर्ष दोघेही एनसीबी कार्यालयात पोहोचले होते. कित्येक तास चौकशी केली असता भारतीसिंह यांना अटक करण्यात आली. तिच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे.
भारतीच्या घरात 86 ग्रॅम गांजा