महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदानादिवशी मुंबईत खासगी आस्थापने बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली सार्वजनिक सुट्टी - विधानसभा निवडणूक बातमी मुंबई २०१९

21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहु नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मुंबई शहर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टीचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे

By

Published : Oct 15, 2019, 8:51 PM IST

Updated : Oct 16, 2019, 4:12 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई शहर जिल्ह्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात सर्व खासगी आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद राहतील. याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत.

अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाच्या दिवशी त्यांना 2 ते 3 तासाची सवलत देण्यात यावी. मात्र, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. आस्थापना बंद न ठेवता मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनेवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत आस्थापनातील कर्मचारी अधिकारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याची संबंधित आस्थापनांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी जोंधळे यांनी सांगितले.

Last Updated : Oct 16, 2019, 4:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details