महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुष्काळी कामांसाठी आचारसंहिता शिथिल; आयोगाचे राज्य सरकारला पत्र - fadanvis

त्याचबरोबर रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे. राज्यातली दाहक स्थिती पाहता दुष्काळ निवारणाची कामे करण्यास हरकत नसल्याचे आयोगाने राज्याला कळवले आहे.

दुष्काळी कामांसाठी आचारसंहिता शिथिल; आयोगाचे राज्य सरकारला पत्र

By

Published : May 6, 2019, 7:48 PM IST

मुंबई- राज्यात दुष्काळी कामांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या मागणीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करत असल्याचे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

दुष्काळी कामांसाठी आचारसंहिता शिथिल; आयोगाचे राज्य सरकारला पत्र

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता दुष्काळी कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी निधी खर्च करण्यात येणार आहे. दुष्काळ निवारणाच्या कामांच्या निविदा नव्याने मागवण्यासह निविदांचे मूल्यांकन, निविदा अंतिम करणे तसेच निविदांसंदर्भातील इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये कुपनलिकांची निर्मिती, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे.

त्याचबरोबर रुग्णालयांच्या पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, नगरपालिका आणि पंचायतींची कामे इत्यादी कामांचा समावेश आहे. राज्यातली दाहक स्थिती पाहता दुष्काळ निवारणाची कामे करण्यास हरकत नसल्याचे आयोगाने राज्याला कळवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details