महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sardar Khan Granted Bail : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खानला जामीन मंजूर - नवाब मलिक

नवाब मलिक यांच्या प्रकरणातील सहारोपी व बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने सरदार खानला मोठा दिलासा दिला आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी खानने मलिक व इतरांशी संगनमत केल्याचा आरोप आहे.

जामीन मंजूर
जामीन मंजूर

By

Published : Jun 6, 2023, 8:38 PM IST

मुंबई - शहरातील 1993 च्या बॉम्बस्फोट कटातील आरोपी सरदार शहावली खान याने सत्र न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल केला. फौजदारी दंड संहितेच्या कलम 88 मधील तरतुदीनुसार जामीन मिळावा असे कोर्टाला त्याच्याकडून साकडे घालण्यात आलेले. नवाब मलिक यांच्या प्रकरणातील सरदार शहावली खान हा सहआरोपी आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने आज अखेर त्याला जामीन मंजूर केला. आर्थिक गैरव्यवहार आणि मुंबई बॉम्बस्फोट खटला अशा दोन्ही गुन्ह्यात तो औरंगाबाद येथील तुरुंगात आहे.



बॉम्बस्फोट खटल्यातील देखील आरोपी -नवाब मलिक यांच्यावर बेकायदा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तसेच टेरर फंडिंग अशा आरोपाखाली गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यांमध्ये सहआरोपी असलेला तसेच मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील देखील आरोपी असलेला सरदार शाहवली खान याने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जाबाबत त्याच्यामार्फत वकिलांनी बाजू मांडली तसेच सक्तवसुली संचलनालयाने देखील बाजू मांडली होती. मात्र न्यायमूर्तींनी या संदर्भात सरदार वली खान शहा याची बाजू उचलून धरली. दोन लाख इतक्या रकमेच्या जात मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला.


इडी सोबत मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात देखील आहे आरोपी - मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासंदर्भात आरोपी असलेला सरदार खान याने नवाब मलिक व इतरांच्या मदतीने मुंबईत कुर्ला येथे गोवावाला कंपाउंडमधील जमीन प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. मुनिरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट कारस्थान रचून बेकायदेशीरपणे त्याने हडपलेली आहे, असा तो आरोप आहे. औरंगाबादच्या तुरुंगामध्ये सरदार खान हा तुरुंगवास भोगत आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या संदर्भात त्याच्यावर गुन्हा आहेच. परंतु तीन एकर जमीन बेकायदा रितीने व्यवहार केल्याचादेखील त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने आरोप ठेवलेला होता.


सक्त वसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत जामिनासाठी अर्ज -आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्या संदर्भातच त्याने जामीन मिळावा याकरिता अर्ज दाखल केला. त्याच्या जामीन अर्जावर अंमलबजावणी संचलनालयाने आपले उत्तर देखील सादर केलेले आहे. मात्र सत्र न्यायाधीश राहुल रोकडे त्यांनी सरदारचा निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयीन सर्व कामकाज झाल्यावर हा निकाल त्यांनी जाहीर केला.


सरदार शाहवली खान यांच्याबाबत पार्श्वभूमी - याच सरदार शाहवली खान याने विशेष तुरुंगातून सामान्य तुरुंगात मला ठेवावे यासंदर्भात औरंगाबाद न्यायालयात आणि त्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र त्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही. आता त्याने सक्तवसुली संचलनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यांमधून जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

हेही वाचा - Nawab Malik Bail : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार

ABOUT THE AUTHOR

...view details