मुंबई - मातोश्री निवास्थानावर माझे प्रेम आहे. अनेक आठवणी मातोश्रीशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र, एखादी जबाबदारी घेतली असताना आवश्यक त्या बाबी पूर्ण करणे हे काम असल्याचे सांगत लवकरच वर्षा निवास्थानाचा ताबा घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात संवाद साधताना ठाकरे यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी मंत्रालयात पदभार स्वीकारला.
हेही वाचा -सत्ता पदांमध्ये फेरबदल; आता काँग्रेसचा उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीकडे विधानसभा अध्यक्षपद?
जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्षद्यावे, असे ही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हटले. जनतेने दिलेल्या करातून विकासकामांसाठी निधी प्राप्त होत असतो. निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून विकासाला गती देणे आवश्यक आहे. सेवाभावनेने कामे केल्यास जनतेचा विश्वाससंपादन करता येईल. ‘सरकारमाझे आहे’ अशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणेही सर्वांची जबाबदारी आहे. विश्वासाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे.
हेही वाचा -विधानपरिषदेत रंगणार ठाकरे विरूद्ध राणे सामना? भाजपचा नवा प्लॅन
राज्याला मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मिळाला असल्याने मुंबईसह राज्याला देशात अग्रेसर करण्याचे स्वप्न घेऊन यापुढे काम करावयाचे आहे. जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. शासन आणि प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना निर्माण होण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांगीण विकाससाधताना कामांची गती आणि दिशेलाही तेवढेच महत्त्व आहे. त्यादृष्टीने प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. अधिकारी आपल्या जबाबदारीचे सक्षमपणे निर्वहन करतील आणि प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.