महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोरेगावमधील नेस्‍को कोरोना सेंटरला मुख्‍यमंत्र्यांची भेट

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर कोरोना केअर सेंटर-२ उभारण्यात येत आहे. या सेंटरला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली.

mumbai
गोरेगावमधील नेस्‍को कोरोना सेंटरला मुख्‍यमंत्र्यांची भेट

By

Published : May 15, 2020, 8:41 PM IST

मुंबई - दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाबाधितांवर रुग्णालय आणि कोरोना केअर केंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर कोरोना केअर सेंटर-२ उभारण्यात येत आहे. या सेंटरला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली.

गोरेगावमधील नेस्‍को कोरोना सेंटरला मुख्‍यमंत्र्यांची भेट
गोरेगावमधील नेस्‍को कोरोना सेंटरला मुख्‍यमंत्र्यांची भेट

गोरेगाव नेस्‍को मैदानावर सभागृह क्रमांक २ व ३ या ठिकाणी करण्‍यात आलेल्‍या व्‍यवस्‍थेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. एकूण १ हजार २४० बेड क्षमता असलेले हे संपूर्ण केंद्र असणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाणार आहे. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी राज्‍याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सहआयुक्त आनंद वागराळकर, देवीदास क्षीरसागर, विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन तसेच मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details