महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाकी तपशिलात खोल शिरू नका.. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राऊतांचे ट्विट - sanjay raut tweet news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींशी त्यांची ही पहिलीच अधिकृत भेट असणार आहे.

CM Uddhav Thackeray to meet the Prime Minister tomorrow in Delhi
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या पंतप्रधानांच्या भेटीला दिल्लीत

By

Published : Feb 20, 2020, 8:42 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. ते मोदींना भेटण्यासाठी नवी दिल्लीला जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील ही पहिलीच अधिकृत भेट असणार आहे. मुख्यमंत्री हे मोदींची सदिच्छा भेट घेत आहेत. जास्त खोलात जाण्याची गरज नसल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे पुण्यात पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी आले होते. त्यावेळी मोदींच्या स्वागतासाठी ठाकरे हे विमानतळावर हजर होते. ती त्यांची अनौपचारिक पहिलीच भेट होती. तेथे फार चर्चा झाली नव्हती. मात्र, उद्या (शुक्रवार) उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची अधिकृत भेट होत

ABOUT THE AUTHOR

...view details