महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात सहन केले जाणार नाहीत'

आज मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ यांच्यातर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारिता करताना कोणत्याही पक्षाचा लेबल लावून घेऊ नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

cm uddhav thackeray
cm uddhav thackeray

By

Published : Feb 5, 2020, 7:58 PM IST

Updated : Feb 5, 2020, 8:04 PM IST

मुंबई - महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्रात अजिबात सहन केले जाणार नाहीत. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना जेथे सापडतील तेथून उचलून आणा, त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून लवकरात लवकर शिक्षा मिळालीच पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ यांच्यातर्फे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमावेळी बोलताना त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारिता करताना कोणत्याही पक्षाचा लेबल लावून घेऊ नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा -'शिवसेना शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करणार'

Last Updated : Feb 5, 2020, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details