महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरात बसून 50 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक राज्यात आणली; मुख्यमंत्री ठाकरेंचे भाजपाला सडेतोड उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवारी) राज्यातील जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी राज्यावर टीका केली. माझ्यावरही घरात बसलेला मुख्यमंत्री म्हणून टीका करण्यात आली. माझ्यावर टीका केली जात असली तरी जूनमध्ये सरकारने 17 हजार कोटींचे तर मागच्या आठवड्यात 35 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Nov 8, 2020, 4:59 PM IST

मुंबई -मी घरात बसून 50 हजार कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक राज्यता आणल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सडेतोड उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा नेत्यांकडून सतत घरात बसलेले मुख्यमंत्री म्हणून टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना मेट्रो कारशेडवरूनही भाजपा मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यानी केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (रविवारी) राज्यातील जनतेशी ऑनलाइनसंवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी राज्यावर टीका केली. माझ्यावरही घरात बसलेला मुख्यमंत्री म्हणून टीका करण्यात आली. माझ्यावर टीका केली जात असली तरी जूनमध्ये सरकारने 17 हजार कोटींचे तर मागच्या आठवड्यात 35 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. या माध्यमातून 52 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली आहे. यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा -मुंबईच्या प्रकल्पात मिठाचा खडा का टाकता? कांजूर कारशेडवरून ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

...म्हणून मंदिर खुले करण्याचा निर्णय नाही!

मंदिरे सुरू करण्याची मागणी सातत्याने भाजपाकडून केली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, मंदिरात गर्दी होते. मंदिरात आपण तल्लीन होऊन आरती, पूजा करतो. त्याठिकाणी एखादा पॉझिटिव्ह रुग्ण येऊन इतरांना कोरोनाची लागण देऊ शकतो. जगात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. राज्यात थंडी दरम्यान दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम नंतर आपल्याला भोगायला लागता कामा नये, म्हणून मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. मंदिरे उघडली तरी तोंडावर मास्क आणि सुरक्षित अंतर पाळावेच लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी घराबाहेर पडत नाही. मी मंदिरे उघडत नाही, म्हणून माझ्यावर टीका होत आहे. माझ्यावर टीका केली जात असली तरी राज्याच्या हितासाठी मी टीका सहन करायला तयार आहे. उद्या यांचे ऐकून काही चुकीचे झाल्यास हेच लोक 'तुमचे तुम्ही बघा' असे बोलून बाजूला हटतील, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे नाव घेता केली.

38 हजार कोटी केंद्राकडे बाकी -

जीएसटी आणि इतर परताव्याचे राज्य सरकारला 38 हजार कोटी रुपयांचे येणे बाकी आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त 5 ते 7 कोटी रुपये आले आहेत. असे असले तरी राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे पॅकेज घोषित केल्याचे सांगत केंद्र सरकार राज्य सरकारला आर्थिक मदत करत नसल्याचे निदर्शनास आणून भाजपाचे पितळ उघडे केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details