महाराष्ट्र

maharashtra

विधान परिषद निवडणूक: शिवसेनेच्या इतिहासात पाहिल्यांदाच पक्षप्रमुखांचा उमेदवारी अर्ज दाखल

By

Published : May 11, 2020, 1:10 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांनी आज विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख,जयंत पाटील शिवसेना नेते एकनाथ शिंदे, संजय राऊत सुभाष देसाई काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नितीन राऊत उपस्थित होते.

chief-minister-uddhav-thackeray
chief-minister-uddhav-thackeray

मुंबई- शिवसेनेच्या इतिहासात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. तसेच कोणतेही घटनात्मक पद स्वीकारले नव्हते. मात्र, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारुन वेगळी वाट निवडली आहे. उद्धव यांनी आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.

हेही वाचा-विधानपरिषद निवडणूक: संजय राऊतांनी मानले काँग्रसचे आभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांनी आज विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख,जयंत पाटील शिवसेना नेते एकनाथ शिंदे, संजय राऊत, सुभाष देसाई, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नितीन राऊत उपस्थित होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांचा अर्ज दाखल करताना पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे ही यावेळी उपस्थित होते.

महाविकास आघाडीकडून सर्वात आधी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनीही आपला अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नमस्कार करुन आपला अर्ज भरला.

काँग्रेसने सहाव्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर गेले दोन दिवस आघाडीत तणाव जाणवत होता. फार अडचणीच्या काळात घटनात्मक पेच टाळण्यासाठी या निवडणुकीचा आग्रह आघाडीने धरला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः निवडणूक लढवत असल्याने हा आघाडीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही होती. मात्र, काँग्रेसने सहाव्या उमेदवाराची तयारी केली. यामुळे आघाडीत तातडीने रविवारी बैठका घेण्यात आल्या त्यानंतर काँग्रेसने नरमाईची भूमिका घेत केवळ एक उमेदवार मागे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आघाडीतील तणाव निवळला. दरम्यान, काँग्रेसचे राजेश राठोड यांच्या कागदपत्रांची पूर्तता राहिल्याने त्यांनी आपला अर्ज उशिरा दाखल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details