मुंबई- शिवसेनेला अनेकांनी गृहित धरले. मात्र, शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही. अखेर सत्ता स्थापन करून दाखवली. अनेकांनी तीन चाकांचे सरकार म्हणत महाविकास आघाडी सरकारची हेटाळणी केली. मात्र, आमच्याकडे चौथे चाक हे जनतेचे आहे. जनतेने आमचे सरकार स्वीकारले आहे. म्हणून आम्ही जनता जनार्धनाचा रथ पुढे नेत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. या सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यानिमित्त आज महाविकास आघाडीतर्फे ' महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता जोरदार टोले लगावले. या पुस्तिकेचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थित पार पडले.
आम्ही राज्यातील कोरोनाचे आकडे लपवले नाहीत
कोरोनाकाळातील परिस्थितीवरही उद्धव ठाकरेंनी भाष्य करताना म्हणाले की, आम्ही राज्यातील कोरोनाचे आकडे लपवले नाहीत. आम्ही कोरोनावर लवकरच मात करू. कोरोनाकाळात मी घराबाहेर पडल नसल्याची अनेकांनी टीका केली. पण, सरकारमधील अनेक जण घरोघरी जाऊन विचारपूस करत होते. देशातील पाश्चिमात्य राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. मात्र, आपल्या राज्यात आपण दुसरी लाट थोपण्यात काही प्रमाणात यश आले आहे.
नैसर्गिक आपत्तीवेळी केलेले राजकारण अत्यंत वाईट