मुंबई - आता राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ब्रॅन्ड अॅम्बेसेडर (सदिच्छादूत) नेमण्याऐवजी स्वत:च त्या त्या ठिकाणी जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सामना या दैनिकाला दिलेल्या या मुलाखतीत ते बोलत होते. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.
यावेळी ते म्हणाले, सरकार एखाद्या प्रतिभावान व्यक्तीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड करते. मात्र, त्यानंतर पुढे त्यांना काय करायचे आहे याबद्दल त्यांना काहीच सांगितले जात नाही. यावेळी ती व्यक्ती सुरुवातीला खूश असते. मात्र, नंतर तिला काहीच सांगितले जात नाही. म्हणून पर्यटनस्थळे, जंगल, लेणी आणि तीर्थक्षेत्रांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर निवडण्याऐवजी ते स्वत: तिथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मला फोटोग्राफीचा छंद असल्याने सोबत कॅमेरा ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगतले.
हेही वाचा - 'बुलेट ट्रेन 'त्यांचा' ड्रीम प्रोजेक्ट; मात्र, जाग आल्यावर वस्तुस्थिती समोर येते'