महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावरकर सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष - Shivaji Park Shiv Sena Dussehra

आतापर्यंत शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा दोन वेळा रद्द झाला होता. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य 'दसरा मेळावा' स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई येथे होणार आहे.

शिवसेना दसरा मेळावा
शिवसेना दसरा मेळावा

By

Published : Oct 25, 2020, 4:33 PM IST

मुंबई - शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्क येथे लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा संपन्न होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात चार भिंती आड बंदिस्त अशा सभागृहात होणार आहे. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसल्यावर हा पहिलाच दसरा मेळावा आहे. यामुळे उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापनेपासून पक्षाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेतला. चाळीस वर्षाहून अधिक काळ हे मैदान बाळासाहेब ठाकरे यांनी गाजवले होते. बाळासाहेब नंतर याच मैदानात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत होते. आतापर्यंत शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा दोन वेळा रद्द झाला होता. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य 'दसरा मेळावा' स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई येथे होणार आहे.

संध्याकाळी ७ वाजता सावरकर सभागृहात मुख्यमंत्र्यांचे भाषण होणार

सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहोळा होणार आहे. सावरकर स्मारकाचा परिसर भगवे झेंडे लावून भगवामय करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ६.३० वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि ठीक संध्याकाळी ७ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भाषण सुरू करून शिवसैनिकांना संबोधित करतील.

उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यावर हा पहिलाच मेळावा असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्याला शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रसारण सोशल मीडियावर केले जाणार असून त्याद्वारे लाखो शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-सिटी सेंटर मॉलची आग विझवण्यासाठी २२८ टँकर पाण्याचा वापर!

ABOUT THE AUTHOR

...view details