मुंबई - अरबी समुद्रात तयार झालेले तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रावर गेल्या दोन दिवसांपासून घोंगावत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुटले आहे. या वाऱ्याच्या तडाख्यामुळे अनेक झाले उन्मळून पडली आहे. महाराष्ट्रात या वादळामुळे काही जागी जीवितहानी आणि नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन वॉर रुम आणि कंट्रोल रुममध्ये थांबून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री बाहेर येत नसल्यामुळे कामात अभाव दिसून येत असल्याचे मत दरेकरांनी व्यक्त केले आहे.
याबाबत बोलताना प्रवीण दरेकर. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीयेत..-
दरेकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता वॉर रुम आणि कंट्रोल रुमध्ये थांबून महाराष्ट्राच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र, दुर्दैवाने गेले अनेक महिने कोरोना असू किंवा इतर संकट आल्यावर मुख्यमंत्री मंत्रालयात येतच नाहीत. त्यामुळे नियोजन आणि नियंत्रणासाठी त्याठिकाणी योग्य ठरत नाही.
मंत्रालयात अधिकारी, सचिव, यंत्रणा सारी मंडळी प्रत्यक्षात कार्यरत करण्यात सोपी पडते. मात्र, मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर न येता व्हिडिओ कॉन्फरंन्सवर कारभार चालवण्यात धन्यता मानतात. त्यामुळे निश्चितपणे कामात गती कमी होते आणि समन्वयाचा अभाव दिसून येतोय, असेही दरेकर म्हणाले आहेत.
हेही वाचा -अरबी समुद्रात अडकलेल्या 273 जणांना वाचवण्याचे नौदलाचे प्रयत्न सुरू