मुंबई- रायगड दौऱ्यानंतर शुक्रवारी (दि. 5 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा बंगला येथे चर्चा झाली. यावेळी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यांविषयी चर्चा झाली असल्याचे एका वृत्तसंस्थेकडून समजते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 5 जून) सकाळी रायगड जिल्हा दौऱ्यात अलिबाग येथील निसर्ग चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यासाठी शंभर कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे.