मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेत फूट पडली. ४० आमदारांनी आणि १३ खासदार शिंदे यांच्यासोबत गेले. ठाणे, नवी मुंबई, नाशिकसह अन्य जिल्ह्यातील माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. दोन्ही गट त्यानंतर आमने-सामने आले. शिंदेंनी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. अशातच अंधेरी पोट निवडणुकीसाठी शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्यात आले. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटासहित राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
Aditya Thackeray Vs Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंचे मिशन वरळी, आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून निवडणूक लढविण्याची दाखविली तयारी - वरळी विधानसभा मतदार संघाकडे लक्ष
शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे परिवाराच्या कोंडीवर भर दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केले आहे. माजी नगरसेवकांना यासाठी गळाला लावले जात आहे. आतापर्यंत दोन नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून उर्वरितांची मनधरणी सुरू आहे. दुसरीकडे नाशिकमधील सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली आहे.
आदित्य ठाकरेंना हादरा देण्याची रणनीती:मुंबईत शिवसेनेची ताकद आहे. मुंबई मनपात गेली २५ वर्षे शिवसेनेने सत्ता राखली आहे. या सत्तेला सुरुंग लावण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. शिवसेना चिन्हावर निवडणूक आलेले यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप मामा लांडे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे हे पाच आमदार तर गजाजन किर्तीकर आणि राहुल शेवाळे हे दोन खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा होईल, असा भाजपचा मानस आहे. त्यामुळे आगामी निवडणूक शिंदे गट आणि भाजप युतीत लढवणार आहे. ठाकरे गटाची यामुळे डोकेदुखी वाढली आहे. मात्र, अनेक भागात असलेले शिवसेनेचे बालेकिल्ले भाजप आणि शिंदे गटाला डोईजड ठरत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघाला हादरा देण्याची रणनीती आखली आहे.
दोन माजी नगरसेवक शिंदे गटात:वरळी, प्रभादेवी आणि दादर भागात शिवसेना ठाकरेंचे प्राबल्य आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याच मतदार संघातून विधानसभेत गेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री शिंदेसहित गटाच्या आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. शिंदे गटाचा उल्लेख मिंधे असा करत डीवचत आहेत. नुकतेच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी वरळीत निवडणूक लढवावी, असे थेट आव्हान दिले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी नगरसेवक संतोष खरात आणि मानसी दळवी यांना गळाला लावत, ठाकरेंना हादरा दिला. आगामी निवडणुकीपर्यंत शाखाप्रमुख, विभाग प्रमुखाना शिंदे गटात घेऊन ठाकरेंची कोंडी करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रयत्न असणार आहे. ठाकरे हा प्लान उलथवून लावणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्र्यांनी चॅलेंज स्वीकारावे:मुंबईत निष्ठावंत शिवसैनिक आहेत. कोणत्याही आमिषाला आजवर बळी पडलेले नाहीत. आजही शिंदे गटात गेलेली लोक अपवाद वगळता कुठून ना कुठून आली होती. सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, दिलीप मामा लांडे अशी काही नाव आहेत. मुंबईतील निष्ठावंत शिवसैनिकांवर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. एवढेच असेल तर, मुख्यमंत्र्यांनी थेट आदित्य ठाकरे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारून वरळीतून आता निवडणूक लढवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे, असा सल्ला किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
हेही वाचा: Shinde Group Criticizes Jitendra Awhad: इतिहासात डॉक्टरेट, तरी ही मानसिकता; आव्हाडांनी आत्मचिंतन करावे- शिंदे गटाचा सल्ला