महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde on Riots : अकोला, शेवगाव दंगलीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश - CM Shinde On Akola Shevgaon Riots

अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज(सोमवारी) दिले आहेत. सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

CM Shinde On Akola Shevgaon Riots
अकोला दंगल

By

Published : May 15, 2023, 9:03 PM IST

Updated : May 15, 2023, 9:44 PM IST

मुंबई:अकोला आणि शेवगाव मधील दंगलींनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दोन्ही ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देत पाहणी करून परिस्थिती समजून घेतली.


दोषींवर कडक कारवाई करा:दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी तसेच जातीय दंगली रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अशा प्रकारच्या जातीय दंगली होणार नाही याची खबरदारी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन:कोणीही कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात येईल अशी कृती करू नये. समाजविघातक कृती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू नये. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करावा. टाकलेल्या पोस्टमुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

अकोल्यामध्ये दोन गटांत हाणामारी: अकोला शहरात काल सोशल मीडियावरील एका पोस्टवरून दोन गटांमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर हे दोन गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात प्रचंड दगडफेक झाली. या घटनेमध्ये दहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले. दंगलीनंतर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रुधुराचा देखील वापर करण्यात आला. या प्रकरणी आत्तापर्यंत सुमारे 30 जणांना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही दगडफेक: अकोल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये देखील काल दगडफेकीची घटना घडली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ही दगडफेक झाली. या घटनेमध्ये बंदोबस्तावर असलेले 4 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आत्तापर्यंत 102 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आत्तापर्यंत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा:

  1. DCM on Akola Ahmednagar Violence : अकोला, अहमदनगर दंगल; देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा, म्हणाले, सोडणार नाही...
  2. Satara Crime : मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणलेली ५ पिस्तुले जप्त; जळगावच्या तस्करासह तिघांना अटक
  3. Pradeep Kurulkar ATS Custody : प्रदीप कुरुलकरला एक दिवसाची 'एटीएस' कोठडी; हनी ट्रॅपमध्ये अजून एक एअर फोर्सचा अधिकारी?
Last Updated : May 15, 2023, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details