महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष या निवडणुकीसाठी सज्ज - मुख्यमंत्री - फडणवीस

भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्ष या निवडणुकीसाठी सज्ज आहेत, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकूण ७ टप्प्यांत ही निवडणूक पार पडेल. पहिल्या टप्प्याला ११ एप्रिल रोजी सुरुवात होणार असून ३९ दिवस ही निवडणूक प्रक्रिया चालेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फाईल फोटो)

By

Published : Mar 10, 2019, 11:50 PM IST

मुंबई- सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. केंद्रीयनिवडणूकआयोगाने आज यासंदर्भात घोषणा केली.

लोकशाहीच्या महाकुभांचे स्वागत !

भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्ष या निवडणुकीसाठी सज्ज आहेत, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एकूण ७ टप्प्यांत हीनिवडणूक पार पडेल. पहिल्या टप्प्याला ११ एप्रिल रोजी सुरुवात होणार असून ३९ दिवस ही निवडणूक प्रक्रिया चालेल.

१७ व्या लोकसभेसाठी देशातील २९ राज्यांत ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल २३ रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्याला ११ एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचा पहिला टप्पाही ११ एप्रिलपासूनच सुरू होईल. तर, १९ मे रोजी निवडणुकांच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यामुळे ३९ दिवसांत निवडणूक आटोपली जाणार आहे. त्यानंतर ४ दिवसांनी मतदानाचा निकाल लागणार आहे.
आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details