नवी मुंबई - देशातले पहिले ज्वेलरी पार्क नवी मुंबईमधील महापे औद्योगिक वसाहतीमध्ये उभे राहत आहे. या पार्कचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्वेलरी संबधित पदवी प्रशिक्षण देणारे विद्यापीठ उभारावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देशातल्या पहिल्या ज्वेलरी पार्कचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन - पार्क
ज्वेलरीमध्ये आपला देश आघाडीवर आहे. सध्या ज्वेलरी क्षेत्रात ७५०० कोटींची उलाढाल होत आहे. ही उलाढाल १० हजार कोटी रुपयांपर्यंत आणल्यास राज्य सरकारचे १ लाख कोटीचे लक्ष पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

२१ एकर जागेत देशातले पहिले ज्वेलरी पार्क उभारले जात आहे. या पार्कमध्ये पाच हजार गाळे असणार आहेत. तसेच या व्यापारासंबधिच्या सर्व सुविधा येथे असणार आहे. यात कॉमन फॅसिलिटी सेंटर , ट्रेनिंग सेंटर आणि कामगारांना राहण्याची व्यवस्था असणार आहे. आज या पार्कचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू , राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडले.