महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM visit KEM Hospital: मुख्यमंत्र्यांची केईएम रुग्णालयाला अचानक भेट; बंद असलेले ६ वॉर्ड दुरुस्त करण्याचे आदेश - केईएम रुग्णालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मध्य मुंबईत आले होते. त्यांनी सायंकाळी उशिरा परळ येथील केईएम रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयातील सहा बंद वॉर्डची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

CM visit KEM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Aug 22, 2023, 7:16 AM IST

Updated : Aug 22, 2023, 7:23 AM IST

मुख्यमंत्र्यांची केईएम रुग्णालयाला भेट

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उशिरा रात्री केईएम रुग्णालयाला अचानक भेट दिली. तेथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयातील सहा बंद वॉर्डची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. केईएम रुग्णालयातील सहा वॉर्ड बंद असल्याचे कळल्यानंतर त्यांनी ही अचानक भेट दिलीय. दुरुस्तीनंतर हे वॉर्ड पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यात 400 ते 450 रुग्णांवर उपचार होऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधून मिळत असलेल्या उपचारांची त्यांनी माहिती घेतली.

बंद वॉर्डांचे काम सुरू :मुख्यमंत्री म्हणाले, मला रूग्णालयात काही सुविधा आणि सेवा चांगल्या स्थितीत आढळल्या आहेत. दोन दिवसात बंद वॉर्डचे काम सुरू होईल, तसे निर्देश दिले आहेत. कळवा रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आलीय. ही समिती 26 ऑगस्टपर्यंत अहवाल देणार आहे.

रुग्णालयातील बंद असलेले सहा वॉर्ड पुन्हा सुरू झाल्यास 450 हूनअधिक बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे या रुग्णालयावरील ताण बऱ्याच अंशी कमी होऊन जास्तीत जास्त रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळू शकणार आहे. यासाठी हे वॉर्ड लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करावेत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश :केईएम रुग्णालय हे मुंबईतील 100 वर्षांहून अधिक जुने आणि नावाजलेले रुग्णालय आहे. त्यामुळे येथील सोयी सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयात काही ठिकाणी उघड्यावर दिसणाऱ्या विद्युत वाहिन्या नीट झाकण्याचे निर्देश देखील यावेळी त्यांनी दिले. तसेच रुग्णांना चांगल्या दर्जाचे दूध उपलब्ध करून द्यावे, असेही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बजावले.

हेही वाचा :

  1. CM Eknath Shinde : कलाकारांना संधी देऊन सन्मान करणारे सरकार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  2. CM Eknath Shinde: विरोधकांकडून वर्षभरापासून चेकमेट करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
  3. Chhatrapati Shivaji Maharaj Hospital: कळवा रुग्णालय १८ मृत्यू प्रकरण लवकरच उलगडणार, समितीची ५ तास बैठक
Last Updated : Aug 22, 2023, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details