महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Cricket Association : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गज एकाच व्यासपीठावर, नेत्यांनी शरद पवारांवर केला कौतुकाचा वर्षाव - राज्यातील दिग्गज नेते एकाच मंचावर

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( Mumbai Cricket Association election ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दिग्गज नेते एकाच मंचावर. क्रिकेटच्या आळंदीत अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला खेळीमेळीत चौकार षटकारांची टोलेबाजी झाली.

Mumbai Cricket Association
मुंबई क्रिकेट असोसिएशन

By

Published : Oct 20, 2022, 7:45 AM IST

मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( Mumbai Cricket Association ) निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ), भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार ( BJP Mumbai President Ashish Shelar ), माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Former Minister Jitendra Awad ) अशी दिग्गज नेते मंडळी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमच्या ( historic Wankhede Stadium ) गरवारे क्लबमध्ये उपस्थित होती. या प्रसंगी आपले राजकीय मतभिन्नता बाजूला ठेवून सर्व नेते मंडळीनी खेळीमेळीच्या वातावरणात आपले विचार आणि भावनांना वाट करून दिली. सर्वांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला.


मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक निमित्त होते: गेल्या तीन महिने झाले राजकीय पक्षाच्या आरोप प्रत्यारोपाच्या मालिकेमुळे अवघा देश महाराष्ट्राकडे पाहत आहे. महाराष्ट्र हे राजकीय संघर्षाचे रणांगण झाल्याने उभा देश नजरा लावून बसलेला आहे. क्रिकेटच्या निवडणुकीसाठीच्या मंचावर आज मात्र राजकीय नेत्यांमध्ये अत्यंत सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज 20 ऑक्टोबर 2022 रोजी होणारी निवडणूक निमित्त होते.


शरद पवार यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात : निवडणूकीकरिता जमलेल्या सभेत जेष्ठ नेते या नात्यानं शरद पवार यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी मार्मिक पण मिश्किल फटकेबाजी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. वानखेडे स्टेडियमची लीज मुदत संपली आहे ती वाढवून मिळावी तसेच मैदानाच्या सुरक्षासाठी कायदा सुव्यवस्था करिता जनतेकडून वसुली करू नये असे म्हणताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. चटकन शरद पवार यांनी म्हटले, परवा बीकेसीमध्ये जी सभा घेतली. त्यात सुरक्षासाठी जनतेकडून वसुली केली गेली. खेळाचे मैदान त्याची सुरक्षा कायदा सुव्यवस्था ही शासनाची जबाबदारी आहे याचे शासनाने भान असू द्यावे, असा वडीलकीचा सल्ला देखील दिला. या उत्तराने सभागृहात 2 मिनिटं हास्याचे कारंजे उडत होते.


अशी मार्मिक टिप्पणी केली :शरद पवार यांच्यानंतर भाषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी शरद पवारांचे कौतुक करत राजकारणात शरद पवारान साहेबांसारखा दिग्गज नेता नाही ते महान आहेत. क्रिकेट खेळाला त्यांनी एक दिशा दिलेली आहे. देशात त्यांचं त्याबाबत मोठ योगदान आहे. पवार साहेबांनी केलेले सूचना आम्ही विचारात घेऊन त्यावर नक्कीच विचार करू. असे म्हणताच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडून विनंती करत माईक स्वतःकडे घेतला आणि सांगितलं, वानखेडे स्टेडियम तेवढं लीजची मुदत राहिलेली आहे. ती वाढून मिळावी इतर खेळाच्या विकासाच्या संदर्भात काही शासनाने सकारात्मक विचार करावा. तसेच वानखेडे यांनी त्या काळात अत्यंत मेहनतीने हे स्टेडियम घेण्यासाठी खटपट केली. हे स्टेडियम टिकले पाहिजे जगले पाहिजे वाचले पाहिजे. महाराष्ट्रात तीन क्रिकेट असोसिएशन आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर मुंबई क्रिकेट असोसिएशन हे ताकदवान आहे. मात्र बाकी दोन ताकदवान नाही. त्याचा जरा शासनाने अधिक विचार करावा, अशी मार्मिक टिप्पणी केली.


निश्चित आम्ही तुमच्या सूचनाचा विचार करू - देवेंद्र फडणवीस : त्यावर त्वरित देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या या टिपणीनंतर सांगितले की, निश्चित आम्ही तुमच्या सूचनाचा विचार करू. विदर्भ बाबत तर मी 100% सांगत आहे की शेषराव हे आमच्या विदर्भातलेच मीही विदर्भाचा आणि विदर्भाला नक्कीच सवलत देऊ. तसेच महाराष्ट्र असोसिएशनला देखील आम्ही सवलत देऊ, असे म्हणत त्यांनी शरद पवारांच्या सूचनांचा स्वीकार करत त्यावर अंमल करण्याबाबत पवारांना अश्वस्त केले.


पवार, शेलार प्यानलला निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन :पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्या संदर्भात गौरवोद्गार काढताना म्हटले, शरद पवार साहेबांच्या सारखा अनुभव कोणाचाच नाही. ते महान नेते आहेत. त्यांचा शब्द आम्ही टाळणार नाही. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बाबत ज्या समस्या मांडल्या सुचना केल्या त्यावर सरकार नक्की अंमल करेल. तसेच पवार साहेबांनी उल्लेख केला की बीकेसी मैदानात जंगी सभा झाली. असे त्यांनी म्हणताच सभागृहात पुन्हा प्रेक्षक हसायला लागले. पुढे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले, मैदानाच्या सुरक्षेसाठी जनतेला भार नको असं त्यांनी पवार साहेबांना म्हटले. मी पवार साहेबांच्या वक्तव्यावर काही बोलणार नाही. मात्र आमची बिकेसी सभा जंगी एकदम मनासारखी झाली. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आशिष शेलार यांनी देखील शरद पवार यांच्या योगदानाची दखल घेत पवार, शेलार प्यानलला निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.


ABOUT THE AUTHOR

...view details