मुंबई: कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. संदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात मुद्दा उपस्थित केला.
छगन भुजबळांनी केला मुद्दा उपस्थित: मराठी भाषा ही 2500 पेक्षा अधिक जुनी आहे मराठी ही संस्कृत पेक्षाही जुनी भाषा असल्याचे दाखले यापूर्वी देण्यात आलेले आहेत भागवत यांनी यासंदर्भात संशोधन केले आणि त्यानंतर दुर्गा भागवत यांनी त्याबाबतीत अधिक माहिती दिलेली आहे. सप्तशती हे मराठीतलं पहिलं साहित्य दोन हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल आहे. त्यामुळे मराठी भाषा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी ची सर्व निकष पूर्ण करते दक्षिणेतल्या काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आलं आहे का याची सरकारने माहिती द्यावी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर प्रयत्न व्हावेत असा मुद्दा छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी: भारतीय जनता पक्षाचे आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार यांनीही यासंदर्भात विधानसभेत बोलताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने प्रयत्न करावेत सर्वांनी यासाठी एकत्र येऊन केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे असे मत व्यक्त केले.
पंतप्रधानांची भेट घेणार: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात माहिती देताना सांगितले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळातर्फे भेट घेऊन त्यांना विनंती करू या शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार असतील पंतप्रधानांना भेटल्यानंतर मराठी भाषेला नक्कीच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी सभागृहात व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे पंतप्रधानांना पत्र: राज्यामध्ये सत्ताबदल झाला असताना सत्तेची सूत्रे हातात घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेचच पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली होती. यासंदर्भात प्रलंबित असलेल्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांना केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रालाही पंतप्रधान कार्यालयाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत, असे म्हटले जात आहे.
मराठी भाषा दिन: मराठी ही राजभाषा तसेच ज्ञानभाषा व्हावी यांसाठी केलेल्या संघर्षामध्ये कुसुमाग्रज नेहमीच अग्रेसर राहिले होते. देशपातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी कुसुमाग्रजांनी खूप काम केले होते. त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘२७ फेब्रुवारी’ रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१३ मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या निमित्ताने मराठी भाषेचा गौरव करण्याचेही राज्य सरकारकडून करण्यात येतो.
हेही वाचा:Elite Status for Marathi: मुख्यमंत्र्यांच्या पत्राला पंतप्रधानांकडून वाटाण्याच्या अक्षता; अभिजात दर्जापासून मराठी भाषा वंचित