नाशिक :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 77.25 टक्के गुणांसह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वृत्तपत्रविद्या, जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 77.25 टक्के गुणांसह पत्रकारिता पदविका उत्तीर्ण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही पदविका अभ्यासक्रम ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्राविण्यसह अर्थात 77.25 टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी कुलगुरू पाटील यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षण नियंत्रक भटूप्रसाद पाटील उपस्थित होते.
शिंदे यांनी या पूर्वी देखील घेतल्या आहेत पदव्या :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधी मुक्त विद्यापीठाची बी.ए पदवी विशेष प्राविण्यसह पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षण क्रमही विशेष प्राविण्यसह पूर्ण केला आहे.
मुख्यमंत्र्यांमुळे विद्यापीठाच्या लौकिकात भर :महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या लौकिकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या यशाने भर पडली आहे,त्यांना प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून विशेष आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या सोहळ्याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू पाटील यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक प्रसाद पाटील, विद्यापीठ मुंबई विभागीय केंद्र संचालक डॉ. वामन नाखले उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाच्या बी. ए. डिस्टिंक्शनसह पदवी प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे मानवी हक्क प्रमाणपत्र अभ्यासक्रमही स्पेशलायझेशनसह पूर्ण केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे अधुरे स्वप्न पूर्ण करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यशात भर पडली आहे. कुलगुरुंनी प्रमाणपत्र देताना कुलगुरू म्हणून खूप आनंद झाल्याचे सांगितले.
- CBI Raid On Sameer Wankhede House : समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ची छापेमारी, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
- Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्हावर अजूनही वाद
- Bawankule on Thackeray : उद्धव ठाकरे हे तर 'रडोबा'; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका