मुंबई : राज्यातील सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केले ( CM Eknath Shinde Assured That Government is Positive ) होते. सदस्य एकनाथ खडसे, भाई जगताप, कपिल पाटील, अनिकेत तटकरे आदींनी सफाई कामगारांच्या वारसांच्या प्रश्नांना परिषदेत वाचा ( Positive to Accommodate Heirs of Cleaning Workers ) फोडली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आश्वस्त करीत, सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही ( CM Shinde Assured to Heirs of Cleaning Workers ) दिली आहे.
सफाई कामगारांना नोकरीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक चर्चा :सफाई कामगारांच्या पाल्यांना, वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नियुक्त्या दिल्या जात आहेत. ज्या ठिकाणी वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्त्या दिल्या जात नाहीत, अशा प्रकारांची माहिती लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. सफाई कामगारांची पदे भरताना मेहतर-वाल्मिकी समाजावर अन्याय होणार नाही, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. मेहतर समाजाचा राज्य शासनाला आदर आहे. नगरपालिकेतील या समाजाच्या रिक्त जागा भरण्याबाबत नगरविकास विभागाला निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.