महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 23, 2019, 4:58 PM IST

Updated : Sep 23, 2019, 6:15 PM IST

ETV Bharat / state

'राष्ट्रवाद' निवडणुकीत अजेंडा का असू नये? - मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

३७० कलम एकमेव निवडणूक अजेंडा नाही. राष्ट्रवाद हा निवडणुकीत अजेंडा असू शकतो. काश्मीरमधील 370 कलम हा आमचा अजेंडा असेल त्यात वावगं काय ?  जगभरात राष्ट्रहिताच्या नावावर निवडणूक लढवल्या जातात.

देवेंद्र फडणवीस

मुंबई- गृहमंत्री अमित शाहंनी जम्मू-कश्मीरमधील ३७० कलम हटवण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुकल्यांची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे. यावर "राष्ट्रवाद हा निवडणुकीत अजेंडा का असू नये ?" असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परीषदेत केला.

बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हेही वाचा-विधानसभेच्या रणांगणात धडाडणार 'या' शिव व्याख्यात्यांच्या 'तोफा'!

विधानसभा निवडणुकीत कलम ३७० मुद्दा कसा असू शकतो या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "३७० कलम एकमेव निवडणूक अजेंडा नाही. राष्ट्रवाद हा निवडणुकीत अजेंडा असू शकतो. काश्मीरमधील 370 कलम हा आमचा अजेंडा असेल त्यात वावगं काय ? जगभरात राष्ट्रहिताच्या नावावर निवडणूक लढवल्या जातात. अमेरीकेत आणि मेक्सिकोत भिंत बांधण्याचा मुद्दा अमेरिकेच्या निवडणुकीत होता. काश्मीर हा भारताच्या अखंडतेचा विषय आहे," असं सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादाचं समर्थन केलं.

Last Updated : Sep 23, 2019, 6:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details