मुंबई -अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, कविता सादर करत 'मी पुन्हा येईन...', असा निर्धार बोलून दाखविला. यावेळी त्यांनी, `मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी... जलयुक्त शिवारासाठी... दुष्काळ मिटविण्यासाठी... युवामित्रांना शक्ती देण्यासाठी...' अशा कवितेच्या ओळीही सादर केल्या.
महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. ते पूर्णपणे सुटलेले नाहीत. भविष्यात आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षांत अनेक आव्हाने आली. आंदोलने झाली. आरक्षणाचे काही प्रश्न मिटले. काही अद्याप तसेच आहेत. पण सर्व प्रश्न मिटवण्यासाठी प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला विठ्ठलरूप मानत त्यांच्या विकासाच्या वारीत मी सहभागी झालो, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.