महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 2, 2019, 2:59 PM IST

ETV Bharat / state

मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री

मालाड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी ५ लाखांची मदत देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार - मुख्यमंत्री


मुंबई -मालाड दुर्घटनेला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. शिवाय याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. मालाडमध्ये संरक्षण भींत कोसळून २० जणांना प्राण गमवावे लागले. याचे पडसाद विधानसभेत उमटले यावेळी विरोधकांनी सरकारला धारेवर धरत महापालिकेवर कारवाई केली जावी अशी जोरदार मागणी केली.

मालाड दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांनी ५ लाखांची मदत देणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवाय महापालिकेनेही ५ लाखांची मदत द्यावी अशा सुचना केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसाने महिन्याभरातीच सरासरी पूर्ण केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. कमी वेळात जास्त पाऊस झाला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या जा भागात पाणी साचले आहे ते काढण्याते काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details